Saturday, July 31, 2010

सहामाही येणारा सण..

 मी तुम्हाला वर्षातुन दोनदा आणि कधीही येणार्‍या एका सणाची माहीती देणार आहे जरा
लक्क्ष देऊन वाचा............
    हा सण तसा सर्वांच्या परीचयाचाच पण तो वेगवेळ्या प्रकारे साजरा केला जातो.आमच्याइथे
हा सण खुप उत्सहात आणि आनंसाने साजरा केला जातो.चला तुम्हीही यात सहभाग नोंदवा.
या सणाचे नाव आहे "निकाल " इंग्लीश मध्ये म्हटले तर "RESULT".
     आमच्या विद्यापीठामध्ये निकाल हा सण म्हणाले की सर्व विद्यार्थांना एक कोर्टातील एखादा खटलाच..
म्हणजे निकाल तर कही लवकर लागत नाही.पण कोर्टासारख्या तारखावर तारखा नक्कीच भेटतात.
झाला म हा कोर्टातील खट्ला... आज एक तारीख भेटली की जो पर्यंत तो दिवस उजाडत नाही तो
पर्यंत त्या तारखेवर अजुन १० ते १२ तारखांची भर पडते.फक्त ऎवढीच एक विभिन्नता आहे
कोर्टातल्या  खटल्या मध्ये आणि आमचा निकाल लागण्यामध्ये.
    आणि जेव्हा निकाळ लागतो त्या दिवशी मग तर पाहायचे कामच नसते,स्वत:चा निकाल गेला
उडत आधी दुसर्‍याला किती पडले याचीच जास्त ऊतसुकता असते.जर का ’ALL CLEAR’
असला तर म आधी त्याला फटके बसनार नंतर अभीनंदन,आणि फटके म्हणजे आनंद
साजरा केला जातो की तो ’ALL CLEAR’ झाला म्हणुन.
  त्याच्या उलटे म्हणजे जर का एखादा विषय राहीला तर म अजुनच आनंद मित्रांसाठी
आणि घरी गेल्यावर स्तब्ध राहून वडलांचे २ शब्द ऎकायचे,नंतर जे आहे ते परत सुरु
करायचे.
  अश्याप्रकारे आमच्याइथे निकालाचा सण साजरा केला जातो,जर तुम्हालाही आवडत
असेल तर आपले स्वागत आहे,पण हो या लेख वर एखादी प्रतीक्रीया जरुर द्या.

1 comment:

  1. हे तर नेहमीचेच उन्हाळे-पावसाळे आहेत रे... च्यायला या निकालाच्या नांदात कित्येक नजिकचे मित्र दुरावतात राव! बाय द वे, निकालाच्या वेळी एन्जॉयमेंट तर असतोच असतो... ऑल क्लिअर निघणार्‍याला कौतुकापेक्षा लाथा-बुक्क्यांचा मारच जास्त खावा लागतो, ह्म्म, मित्रांच्या प्रेमापोटी, हे खरंय...

    ReplyDelete

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Blogger Templates