Monday, March 8, 2010

प्रेम म्हणजे काय? ............

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो?
आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही.
मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा.
प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.



एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,

सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?

अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.



अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?



प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.

सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?



ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.

मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.

तुझा आवाज सुंदर आहे.

तू अतिशय काळजी घेणारी आहेस.

तू अतिशय प्रेमळ आहेस

तू विचारी आहेस.

तुझे हास्य मोहक आहे.

तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.



प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.



प्रिये,

तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.

पण आता तू बोलू शकतेस का?

नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.



तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.



तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.

पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.



खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
तुम्हीच सांगा...........

1 comment:

  1. Jyaada kuchh to samajh nahi aaya ..... par phir bhi ... achha h ...
    gud
    keep it up !!

    ReplyDelete

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Blogger Templates