Monday, March 8, 2010

प्रेम म्हणजे काय? ............

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो?
आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही.
मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा.
प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.



एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,

सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?

अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.



अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?



प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.

सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?



ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.

मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.

तुझा आवाज सुंदर आहे.

तू अतिशय काळजी घेणारी आहेस.

तू अतिशय प्रेमळ आहेस

तू विचारी आहेस.

तुझे हास्य मोहक आहे.

तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.



प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.



प्रिये,

तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.

पण आता तू बोलू शकतेस का?

नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.



तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.



तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.

पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.



खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
तुम्हीच सांगा...........

माझं प्रेम.........................

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो.

माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं

नकळत का होईना मी हि हरवून जायचो

कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो



दिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचो

हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो

नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो

रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ

पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो



Weekends ला कधी MALL मध्ये जायचो

खूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचो

ओठातून काही शब्दच निघेनात

फक्त चेहर्याकडे बघून Blush करायचो



सगळंच आता भूतकाळात विरून गेलं

माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं

जाता जाता मला खूप वेदना दिल्या

पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं

जाता जाता खूप काही शिकवून गेलं



किती तरी नाती आपण गृहीत धरतो

त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो

समजत नाही कधी मोल नात्यांचं

आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं



आज खरंच समाधान वाटतंय

कि मी हि कधी प्रेम केलं होतं

खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं

जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

Tuesday, January 19, 2010

काही माझ्याबद्दल................

              मरठी मुलगा:-
              वर्गा मध्ये अनेक मुले असतात,
                      पण जो गोड हसतो,
                   तो मुलगा मराठी असतो.

            वर्गा मध्ये मुले स्टाईल करतात,
       पण जो स्टाईल करुन विनम्रता ने बघतो,
                तो मुलगा मराठी असतो.

               वर्गा मध्ये अनेक मुले असतात,
      पण कोनी मुलींची छेड कढणार्‍यांना  मारनारा,
                 तो मुलगा मराठी असतो.

              वर्गा मध्ये अनेक मुले असतात,
     पण स्वतः च्या नोट्स  दुसर्‍यांना सहज देनारा,
                  तो मुलगा मराठी असतो.

    शोपींग अनेक मुले करतात पण शोपिंग करतांनी
              पैसे आणी घरच्यांचा विचार करनारा,
                 तो मुलगा मराठी असतो.
     (मला अभीमान आहे मी मराठी असल्याचा......)

प्रेम नेमके काय असते......

                            ़प्रेमाच नात़़

         प्रेम हे एक नात असत
                      ते प्रत्येकाला मिळेलच अस नसत,
         प्रेमामध्ये सुवास असतो
                       जो फक्त प्रेम करणार्यालाच मिळतो,
         प्रेमाला दोस्तीची एक सान्गड आसते
                       त्यावरच प्रेम रचलेले असते,
         प्रेम करने गुन्हा नसतो  
                       ते तर नाते बान्धणारा धागा असतो
         प्रेम हे काही खेळ नसते
                       ते दोन जीवन्ना भेटवणारे नाते असते,
         प्रेमाचा प्रवास हा मित्रतेनेच सुरु होतो
                       त्यासाठी प्रथम मित्रतेची गरज असते,
         फक्त एकाकडून प्रेम असून चालत नसते
                       प्रेमाची गाडी चालवण्यासाठी दुसर्या चाकाचीही आवश्यकता असते,
         ’माझे प्रेम आहे’ हे सर्वाना सान्गणे योग्य नसते
                       कलीयूगामध्ये काही लोकान्ना ते खपत नसते,
         ते सम्पवन्यासाठी  त्यान्ना क्षणाचाही अवधी लागत नाही
                        पण जर विश्वास अटूट असेल तर ते शक्य नसते,
         प्रेम हे तर एक नाते असते
                        ते प्रेत्येकाला मिळण्यासारखे नसते............!
                                                                                  कवी:-
                                                                                        दिलीप खडसे.
                                    
                                                       
Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Blogger Templates